Pashusavardhan Vibhag Pune 2023: पुणे पशुसंवर्धन विभाग येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदांच्या 446 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. तसेच अर्ज प्रक्रिया https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे होत आहे, सदर जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
The recruitment notification is published by Pashusavardhan Vibhag Pune to fill various vacant posts. Interested applicants apply before the last date. More detail is given below:-
Applications are being invited application for Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Wireman, Technician, and Vapor attendant. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply online through the given link of ahd.maharashtra.gov.in from 27th May 2023. The last date for submission of the online applications 11th of June 2023. For more details about AHD Pune Bharti 2023

Pashusavardhan Vibhag Pune 2023
पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर
एकूण पदे: ४४६ पदे
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा कधी होणार : जुलै २०२३ मध्ये (परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस लिंक)
परिक्षा शुल्क –
अमागास – १०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable)
नोकरी ठिकाण: पुणे
वयोमर्यादा –
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
PVP Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
पशुधन पर्यवेक्षक | 376 पदे |
वरिष्ठ लिपीक | 44 पदे |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | 02 पदे |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | 13 पद |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 पद |
तारतंत्री | 03 पदे |
तांत्रिकी | 02 पदे |
बाष्पक परिचर | 02 पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुधन पर्यवेक्षक | (i) उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि (ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा (ii) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा (iv) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा (v) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी. |
वरिष्ठ लिपीक | सांविधिक विद्यापीठाची पदवी. |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र 2. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 1. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि 2. महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा. |
तारतंत्री | 1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र 2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव |
तांत्रिकी | 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2. कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र 3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव. |
बाष्पक परिचर | 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. 2. महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक 3. बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा 4. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे |
Salary Details For Pashusavardhan Vibhag Pune Jobs
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुधन पर्यवेक्षक | एस-8, (25500-81100) |
वरिष्ठ लिपीक | एस-8, (25500-81100) |
लघुलेखक (उच्चश्रेणी) | एस-15, (41800-132300) |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | एस-14, (38600-122800) |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | एस-13, (35400-112400) |
तारतंत्री | एस-06, (19900-63200) |
तांत्रिकी | एस-06, (19900-63200) |
बाष्पक परिचर | एस-06, (19900-63200) |
आपल्याला खालील माहितीसह मदत केली जाईल:
• प्रवेश पासवर्ड, उपयोगकर्ता नाव, संपर्क अंक आणि इतर आवश्यक माहिती तय
Selection Process For Pashusavardhan Vibhag Pune Notification 2023
- सर्व पदांसाठी, केवळ मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा जिल्हाच्या मुख्यालयात घेण्यात येईल.
- संगणक आधारित परीक्षेतील (कंप्यूटर आधारित ऑनलाइन परीक्षा) प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करावे लागेल.
- संगणक आधारित परीक्षेतील (कंप्यूटर आधारित ऑनलाइन परीक्षा) प्रत्येक प्रश्नाच्या २ गुणांसह असेल.
- शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेल्या पदांसाठी, संगणक आधारित (कंप्यूटर आधारित परीक्षा) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांच्या प्रत्येकीसाठी ५० गुणांची आणि एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेची कालावधी दोन तासांची असेल.
- शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेल्या पदांसाठी, संगणक आधारित (कंप्यूटर आधारित परीक्षा) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांच्या प्रत्येकीसाठी ३० गुणांची आणि एकूण १२० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. तसेच शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणीसाठी ८० गुणांची राहील, त्यासाठी दोन तासांची कालावधी असेल.
Previous update –
Applications are being invited from retired veterinary officers from the Animal Husbandry Department for appointment on an honorarium basis as per prevailing policy. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications 21st of February 2022. Furthermore, applicants are requested to ensure that their applications reach the designated address within the specified time frame. It is imperative to submit all the required documents and information accurately to avoid any discrepancies in the application process. The selection committee will thoroughly review the received applications and shortlist candidates based on the eligibility criteria and qualifications mentioned in the job advertisement.
The selection committee will assess each applicant’s suitability for the position based on their performance during the evaluation process. Final decisions regarding the selection and appointment of candidates will be communicated to the successful individuals after completion of the entire selection procedure.
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.